Image Gallery
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविदयलाय,मिरज
इतिहास विभाग
सन 2019-20 मधील विविध उपक्रम
महात्मा गांधी : विचार व कार्य
चर्चासत्र
दि.1ऑक्टोबर 2019
शिक्षणमहर्षी
डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथील इतिहास विभाग आणि इतिहास
अभ्यास मंडळामार्फत 'महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त दि. 1
आँक्टाेबर 2019 राेजी ' 'महात्मा गांधी : विचार व कार्य' या विषयावर
विद्यार्थ्याचे चर्चासत्र महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. उदयसिंह
मानेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सदर चर्चासत्रामध्ये 9
विद्यार्थ्यांनी आपले निबंध सादर केले. चर्चासत्रामध्ये समाजशास्त्र
विभागप्रमुख डॉ. सतिश देसाई यांचे " महात्मा गांधी यांचे सामाजिक विचार" या
विषयावर विशेष व्याख्यान आयाेजित करण्यात आले हाेते. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ. अर्चना जाधव यांनी केले. आभार कु.
तेजस्विनी सावंत हिने मानले. सूत्रसंचालन कु. रुतुजा माेरे हिने केले.
कार्यक्रमास प्रा. जाेतीराम आंबवडे, डॉ. राजश्री मालेकर, प्रा. सुहास
वाघमाेडे, डॉ. पुष्पा पाटील, डॉ. संपदा टिपकुर्ले, श्री. नामदेव भाेसले
यांच्यासह विद्यार्थी - विद्यार्थिनी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
सदर चर्चासत्राचे विषय
1. महात्मा गांधींचे तत्वज्ञान
2. महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य
3. महात्मा गांधी आणि स्वराज्य
4. महात्मा गांधींचे राजकीय विचार व कार्य
5. महात्मा गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील याेगदान
6. महात्मा गांधींचे शैक्षणिक विचार व कार्य
7. महात्मा गांधींचे सामाजिक कार्य : अस्पृश्यता, ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण
8. महात्मा गांधींचे साहित्य
9. महात्मा गांधी : समज आणि अपसमज
10. महात्मा गांधी आणि आजची तरूणाई
11. सद्यस्थितीत महात्मा गांधींच्या विचारांची गरज
12. महात्मा गांधींविषयी अन्य काेणताही विषय
महात्मा गांधीजीच्या 150 व्या जयंतीनिमित्त 'गांधी' चित्रपट
दि.30 सप्टेंबर 2019
शिक्षणमहर्षी
डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथील इतिहास विभाग आणि इतिहास
अभ्यास मंडळामार्फत महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त दि. 30
सप्टेबर, 2019 राेजी "गांधी " हा ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपट
सभागृहामध्ये स.10.00 ते दु.01.00 या वेळेत दाखविण्यात आला.याप्रसंगी
इतिहास विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग तसेच इतिहास विभागातील विद्यार्थी
विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतिहास अभ्यास मंडळाचे उदघाटन व व्याख्यान
दि.03 ऑगस्ट 2019
मिरज
दि.3 ऑगस्ट 2019 : शिक्षणमहर्षी डाँ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या
इतिहास विभागामार्फत आयाेजित 'इतिहास अभ्यास मंडळ' उद्घाटन समारंभात 'छत्रपती संभाजी महाराज'
या विषयावर बाेलताना डाँ. इस्माईल पठाण, समारंभाचे अध्यक्ष मा.प्राचार्य
उदयसिंह मानेपाटील,इतिहास विभागप्रमुख डॉ.अर्चना जाधव, प्रा.जोतिराम
आंबवडे, डॉ.राजश्री मालेकर व उपस्थित विद्यार्थी
सांगली जेलफाेड आंदाेलन
सांगली जेलफाेड आंदाेलन 76 वा शाैर्यदिन
दि.24 जुलै 2019
शिक्षणमहर्षी
डाँ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथील इतिहास विभागाची दि. 24
जुलै 2019 राेजी राेटरी क्लबमार्फत हुतात्मा स्मारक, सांगली येथे आयाेजित
केलेल्या 'सांगली जेलफाेड आंदाेलन शाैर्यदिन' कार्यक्रमास उपस्थिती,
याप्रसंगी प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी असणारे एकमेव हयात ज्येष्ठ
स्वातंत्रसैनिक श्री.जयराम कुष्टे यांच्यासोबत प्रा. जे. व्ही. आंबवडे व विद्यार्थी
शिक्षणमहर्षी
डाँ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथील इतिहास विभागातील शिक्षक व
विद्यार्थ्यांची दि. 24 जुलै 2019 राेजी मराठा सेवा संघ व सर्व पुराेगामी
संघटनेमार्फत महात्मा गांधी चाैक, मिरज येथे आयाेजित केलेल्या 'सांगली
जेलफाेड आंदाेलन शाैर्यदिनानिमित्त' स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्याच्या
कार्यक्रमास उपस्थिती...
Comments
Post a Comment