माेडी लिपी वर्गाचे उद्घाटन आणि माेडी लिपी वर्ग
(2018-19) प्रमाणपत्र वितरण समारंभ
18/12/2019
शिक्षणमहर्षी डाँ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथील इतिहास विभागामार्फत शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्यव विस्तार विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या माेडी लिपी वर्गाचे उद्घाटन आणि माेडी लिपी वर्ग (2018-19) प्रमाणपत्र वितरण समारंभ आज दि. 18/12/2019 राेजी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डाँ. उदयसिंह मानेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माेडी लिपी वर्गाचे मार्गदर्शक मा. श्री. मानसिंगराव कुमठेकर हाेते. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डाँ. अर्चना जाधव यांनी केले. आभार प्रा. जाेतीराम आंबवडे यांनी मानले. सूत्रसंचालन कु. तेजस्विनी सावंत हिने केले. कार्यक्रमास प्रा. टि. एस. भंडे, डाँ. लिलावती पाटील, डाँ. राजश्री मालेकर, प्रा. साै. स्वाती हाके, प्रा. साै. लक्ष्मी पवार, प्रा. सुनिल मनवाडकर, प्रा. विलास साळुंखे, प्रा. संजय पाटील, डाँ. संपदा टिपकुर्ले, डाँ. निशा मुगडे, प्रा. भारती काेळेकर, श्री. नामदेव भाेसले, श्री. बाळू काळे, माेडी लिपी वर्गाचे आजी- माजी विद्यार्थीआणि महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
Comments
Post a Comment